History of C Language

C लॅंग्वेजचा इतिहास सुद्धा खुप रंजक आहे. C लॅंग्वेज चे नाव ऐकल्या ऐकल्या आपल्याला या लॅंग्वेजला C असे नाव का दिले असावे याची उत्सुकता वाढते. तुमच्या सारख्या उत्सुक विद्यार्थी मित्र मैत्रिणींना लॅंग्वेज शोधुन काढणाऱ्यांचे अद्याक्षर आहे की काय असेही वाटेल…C असे नाव देण्यामागे थोडी रंजकता नक्कीच आहे.

CPL

१९६० च्या दशकात जगभर सर्व मान्य अशा बहुगुणी व आखुडशिंगी संगणकीय भाषा शोधण्याचे प्रयत्न चालु होते. AT&T Bell Labs येथे Common Programming Language कॉमन लोकांना समजावी म्हणुन शोधली त्याला CPL असे नाव दिले. खरं तर तीचं नाव Combined Programming Language किंवा Cambridge Programming Language असं होत. त्या पुर्वी तीच नाव Cambridge Plus London (CPL) असं होत कारण ती develop करण्यासाठी Cambridge University आणी London University नी एकत्र प्रयत्न केले होते. पण क्लिष्ट असल्यामुळे प्रतिसाद मिळाला नाही व 1970 च्या आसपास CPL लुप्त होउन गेली.

BCPL

BCPL developer

BCPL developer

पुढे Martin Richards या शास्त्रज्ञाने CPL मधील क्लिष्टपणा कमी करून 1966 मध्ये नवीन लॅंग्वेज शोधुन काढली. पण त्यासाठी CPL मध्ये काही अधिक मिळवण्यात आले होते.  म्हणुन नावामध्ये एक अद्याक्षर वाढवले. याचे नाव BCPL ठेवण्यात आले. The BCPL was clean, consistent, powerful and portable. काही प्रोग्रॅमर BCPL ला गमतीने Before C Programming Language म्हणायचे…!

B

B Language Developer

B Language Developer

काही काळ गेल्यानंतरही यातही काही त्रुटी सापडु लागल्या व काहीसा भाग प्रोग्रॅमर मंडळीना अनावश्यक वाटु लागला. Ken Thompson या उद्योगी शास्त्रज्ञाने मग 1969  मध्ये BCPL चा अनावश्यक भाग काढून टाकला व नवीन लॅंग्वेज शोधुन काढली. त्यांच्या वर BCPL या लॅंग्वेज चा पगडा होताच. पण अन्यावश्यक गोष्टी काढुन टाकल्या असा त्यांचा विश्वास होता. म्हणुन BCPL या भल्या मोठ्या नावातील CPL  या अद्याक्षरांना सोडचिठ्टी देउन नवीन लॅंग्वेजला नाव दिले B…!

C

C Language Developer

C Language Developer

इतके सर्व होउनही अजुन ही सर्व काम करणारी मंडळी समाधानी नव्हती. ज्या कंपनीत B लॅंग्वेज डेव्हलप करणारी व्यक्ती होती त्याच कंपनीत त्याचा सहकारी मित्र काम करत होता. त्याचे नाव Dennis Ritchie. त्याने त्याच्या सहकारी मित्राबरोबर B लॅन्ग्वेजवर सुद्धा काम केले होते. या महाभागाने नवीन लॅंग्वेज वर काम करायला सुरवात केली. आणि ३ वर्षे काम करून त्याने 1972 मध्ये लॅंग्वेज चा शोध सुद्धा लावला. सहकाऱ्याने B ठेवली होती या पट्ठ्याने C ठेवुन टाकली…! आणी हिच ती बहुगुणी व आखुडशिंगी संगणकीय भाषा….

Watch and Listen history of C language on http://www.cmarathionline.com/history-of-c-language/

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s